नागपूर, दि. १९ (प्रतिनिधी) - सिंचन घोटाळ्यात अडकलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईच्या वादग्रस्त शुभदा हाऊसिंग सोसायटीत एक दोन नव्हे तर चक्क ८ फ्लॅट दुसर्याच्या नावाने खरेदी केले असल्याची धक्कादायक माहिती कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व शुभदा सोसायटीचे अध्यक्ष रणजित देशमुख यांनी आज दिली.
मुंबईतील वादग्रस्त शुभदा हाऊसिंग स्किममध्ये राज्यातील अनेक मातब्बर पुढार्यांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे तसेच काहींनी बेनामी फ्लॅट्स घेतले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. सरकारच्या जागेवर होणार्या प्रत्येक फ्लॅटस्किममध्ये अनुसुचित जाती आणि मागासवर्गीयांसाठी फ्लॅट्स ठेवावे लागतात. मात्र या वर्गातील सदस्य समोर न आल्याने काहींनी बनावट एससी आणि ओबीसी सदस्य आणून त्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा आरोपही रणजित देशमुख यांनी केला.
फ्लॅटची किंमत २ कोटीच्या वर
- ६०० वर्गफुटाच्या प्रत्येक फ्लॅटची किंमत तब्बल २ कोटीच्या वर आहे. त्यामुळे एकट्या अजित पवारांची गुंतवणूक १६ कोटीच्या घरात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. याच पद्धतीने कॉंगेसचे खासदार विजय दर्डा यांनीही फ्लॅट्स घेतल्याचे देशमुख यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
साभार:
http://www.saamana.com/2013/April/20/Link/Mumbai2.htm

No comments:
Post a Comment