नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था) - ‘लाच’ खाऊन ‘इटालियन’ फिनमेकानिका या कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहारात आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कनिष्क सिंह यांचेही नाव पुढे आले आहे.
- कनिष्क सिंह हे माजी परराष्ट्र सचिव, राजस्थानचे माजी राज्यपाल एस. के. सिंह यांचे पुत्र असून त्यांनी राहुल गांधी यांचे सचिव म्हणून काम केलेले आहे. कनिष्क हे राहुल यांच्यासोबत बहुतेकदा दिसतात.
- हेलिकॉप्टर घोटाळ्यात नाव असलेला दलाल जी. राल्फ हैश्के हा ‘एमार एमजीएफ’ या रियल इस्टेट कंपनीत संचालक होता. त्या कंपनीत कनिष्क सिंह यांचे वडील भागीदार होते. राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा उजेडात आल्यानंतर हैश्के हा ‘एमार एमजीएफ’ कंपनीतून बाहेर पडला. ही कंपनी वेदप्रकाश गुप्ता यांची होती.
- कनिष्क सिंह यांच्यामुळेच ‘एमार एमजीएफ’ या कंपनीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवेळी मोठे कंत्राट मिळाले होते.
- हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील एक दलाल ख्रिस्तीयन मिशेल यांच्या वडिलांचा कॉंग्रेस पक्षाशी निकटचा संबंध होता. १९८० व १९९०च्या दशकात ते हिंदुस्थान सक्रिय होते.
भाजपचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी ही पार्श्वभूमी नमूद करून सीबीआयला एक पत्र पाठवले आहे. हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात कनिष्क सिंह, दलाल हैश्के आणि एमार एमजीएफ कंपनी यांच्या सहभागाची चौकशी करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
साभार
http://www.saamana.com/2013/February/16/Link/Main6.htm

No comments:
Post a Comment