200 कोटींचा गंडा : पत्नीसह समीर जोशींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
नागपूर : देशभरातील पाच हजारांवर गुंतवणूकदारांना सुमारे 200 कोटींचा गंडा घातल्याच्या आरोपावरून आज गुन्हेशाखेच्या पथकाने श्री सूर्या समूहाचे सर्वेसर्वा समीर सुधीर जोशी तसेच त्यांची पत्नी पल्लवी जोशी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूर-विदर्भाच्या आर्थिक क्षेत्रात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
दोन ते अडीच वर्षात रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रच नव्हे तर विविध प्रांतातील गुंतवणूकदारांकडून समीर जोशी आणि त्याच्या एजंटस्नी कोट्यवधी रुपये गोळा केले होते. गुंतवणूकदारांना विश्वास बसावा म्हणून जोशी अँन्ड कंपनी पुढच्या तारखेचे धनादेश (पोस्टडेटेड चेक) देत होते.
गेल्या सहा-आठ महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांची नियोजित मुदत पूर्ण झाली त्यांनी आपली रक्कम परत घेण्यासाठी जोशींच्या कार्यालयात गर्दी करणे सुरू केले. त्या सर्वांना जोशीने रक्कमेऐवजी प्रॉमिसरी नोट दिल्या. तेव्हापासून गुंतवणूकदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणे सुरू झाले. विशिष्ट मुदतीनंतर त्यांनी पुन्हा जोशीच्या घरी, कार्यालयात आपली रक्कम परत मागण्यासाठी गर्दी सुरू केली. यावेळी जोशीचे ‘बाउन्सर‘ गुंतवणूकदारांना गप्प करीत परत पाठवू लागले. परिणामी गुंतवणूकदारांची ओरड आक्रोशात रूपांतरीत झाली. त्यातील काहींनी आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात तर काहींनी गुन्हेशाखेकडे तक्रारी दिल्या.
अशाचपैकी अमित गोविंद मोरे (वय ३६, रा. ६३, पावनभूमी, सोमलवाडा, वर्धा रोड, नागपूर) या हॉटेल व्यावसायिकानेही गुन्हेशाखेकडे तक्रार नोंदविली. त्यांनी जोशींकडे ५ लाख रुपये गुंतविले होते. मोरेंच्या नंतर अनेकांनी तशाच प्रकारच्या तक्रारी नोंदविणे सुरू केले. दरम्यान, गुंतवणूकदार तक्रारकर्त्यांचा आकडा फुगत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली.
या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक भोये यांनी तपास सुरू केला.
चहा टपरीवाला अन् उद्योजकही
जोशीचे व्यापक नेटवर्क
समीर जोशीच्या श्री सूर्या समूहाचे नेटवर्क केवळ नागपूर, विदर्भ, महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य प्रांतांतही असल्याचे उघड झाले. जोशीकडून कमिशन घेण्याच्या नादात अनेक एजंटस्नी चहा टपरीवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकांना मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत जोशी अँण्ड कंपनीने सुमारे पाच हजार गुंतवणूकदारांना चुना लावल्याचे उघड झाले. त्यावरून गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेच्या पथकाने जोशीच्या कार्यालय, निवासस्थानासह छत्रपती चौक तसेच सीताबर्डीतील प्रतिष्ठानासह अनेक ठिकाणी धडक दिली. (प्रतिनिधी)
महत्त्वाची कागदपत्रे जप्त
प्रतापनगरातील विद्याविहार टेलिकॉमनगरातील श्री सूर्या इम्पेरियलमध्ये पोलिसांनी आज सकाळपासूनच झाडाझडती सुरू केली. जोशीची कसून चौकशी करतानाच पोलिसांनी त्याच्याशी संबंधित स्थावर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराच्या नोंदी असलेली अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे आज जप्त केली. जोशीने हा प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेसह सरकारच्या संबंधित विभागाची परवानगी घेतली होती काय त्याचीही चौकशी पोलिसांनी केली. बँकेतील त्याची खाती, लॉकरची माहिती घेतल्यानंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात समीर आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
साभार
लोकमत – रवि, १५ सप्टेंबर २०१३
http://marathi.yahoo.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-190942397.html

Dear Readers,
ReplyDeleteWe will update you and our country people about scams. If you also come across any news or details about any scam, please send us by mail on scamsleak@gmail.com.
High regards.
Editor